जनतेज न्युज

शहरातील मुख्य स्मशानभूमींची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी* स्मशानभूमीतील आवश्यक कामे पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश

प्रतिनिधी, ठाणे : गेले आठवडाभरापासून महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांचा दैनंदिन पाहणी दौरा सुरूच असून आज शहरातील मुख्य असलेल्या जवाहरबाग  स्मशानभूमीचा पहाणी दैरा माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या समवेत केला व आवश्यक असलेली दुरूस्तीची कामे, रंगारंगोटी करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. आज  महापालिका आयुक्त डॅा. शर्मा यांनी जवाहरबाग स्मशानभूमी मध्ये गॅस शवदाहिनी बसविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. तर डिझेल शवदाहीनी नादुरुस्त असल्याने ती काढून टाकण्याचे निर्देश देखील आयुक्तांनी दीले आहेत. या स्मशानभूमीमध्ये स्वच्छता ठेवणे, काही ठिकाणी डागडुजीची अपूर्ण असलेली कामे पूर्ण करणे, या ठिकाणी अत्यंविधीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पाण्याची सोय उपलब्ध करुन देणे तसेच आसनव्यवस्था उपलब्ध करण्याबाबतच्या सूचना आयुक्‌तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या पाहणी दौऱ्यास माजी नगरसेवक सुधीर कोकाटे माजी नगरसेवीका पल्लवी कदम तसेच उप आयुक्त अशोक बुरपल्ले, उप आयुक्त मनीष जोशी, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, उप नगर अभियंता विनोद गुप्ता,