प्रतिनिधी , पुणे : राज्यात केमिकल झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी मधील अनेक कंपन्यांमुळे येथील जलस्त्रोत पूर्णपणे दूषित झाले असून या ठिकाणी आग,स्फोट या घटना नित्याचेच झाल्याने
प्रहार जनशक्ति पक्षाचा वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलय.
स्थानिक तरुणांना कायमस्वरुपी नोकरीस घ्याव,कारखांन्यामधील दुषीत पाणी व वायु यामुळे होणारे प्रदुषण जीव सृष्टीला हानीकारक ठरत आहेत,या दुषीत पाण्यामुळे तीस ते चाळीस मेंढ्या मृत्यु मुखी पडल्या होत्या. औद्योगीक वसाहतीत मागील काही दिवसामध्ये अनेक कंपन्यामधे अगीचे तांडव सुरुच आहे.तरी देखील प्रशासन डोळ् झाक करत आहे.अनेक कारखाने जिव सृष्टीला हानिकारक ठरु लागले आहेत अशा अनेक मागन्यांसाठी कुरकुंभ औद्योगीक वसाहती चा कार्यालयासमोर प्रहार जनशक्ति चे रमेश शितोळ् यांचा नेतृत्वा खाली बोंबाबोंब अांदोलन करण्यात आलय.
