जनतेज न्युज

कृषि कायद्याच्या समर्थनार्थ नंदुरबार भाजपा तर्फे कृषि कायद्याच्या प्रतिचे दूधाने अभिषेक …

प्रतिनिधी , नंदुरबार : केंद्र सरकारने आनलेल्या कृषि कायद्याला पाठिंबा देण्यासाठी तसेच ह्या कायद्याला विरोध करणाऱ्या आघाडी सरकारच्या निषेध करण्यासाठी आज नंदुरबार जिल्हा भाजपा च्या वतीने आंदोलन करण्यात आले ,यावेळी कृषि कायद्याची प्रतिचे दुधाने अभिषेक करण्यात आला .
केंद्र सरकारने केलेले कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत विरोधक केवळ विरोध करण्यासाठी सदर विधेयकांना विरोध करीत असून जनतेची दिशाभूल करीत आहे . शेती सुधारणा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार महाराष्ट्रात होते. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार या कायद्याचे समर्थन केले होते मग आता विरोध का ? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात राज्यात हे आदेश पाळले गेले होते तेच आदेश आता केंद्र सरकार पाळत आहे .मग विरोध कशाचा करता आहे .म्हणून कृषि कायद्याच्या समर्थनार्थ आज कृषि कायद्याच्या प्रतिचे दुधाने अभिषेक करण्यात येऊन राज्य सरकार चा निषेध करण्यात आला ,यावेळी खासदार हीना गावित ,भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील आदी उपस्थित होते .