जनतेज न्युज

केंद्र सरकारने नागपुर मेट्रो टप्पा दोन करता पाच हजार कोटींची तरतुद केली.

केंद्र सरकारने नागपुर मेट्रो टप्पा दोन करता पाच हजार कोटींची तरतुद केली.पण पुणे मेट्रोला माञ वाटाणाच्या अक्षताच मिळाल्या.पण याकरता राज्य सरकारने तरतुद करावी .अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी केली.

राज्य सरकारचे नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले.या अधिवेशनात माधुरी मिसाळ यांनी एचसीएमआरटी,आंबील ओढा संरक्षक भिंत ,स्वारगेट ते काञज मेट्रो डीपीआर ,एसआर ऐ प्रकल्प अशा विविध गोष्टी बाबत राज्य सरकारकडडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले .दरम्यान पुणे मेट्रो बाबत केंद्रात भाजपच्या राजकीय नेतृत्वास अधिकची तरतुद घेता न आल्याचे अपयश पाहता माधुरी मिसाळ यांनी माञ याकरता राज्य सरकारनेच यावर्षीच्या बजेट मध्ये तरतुद केली नसल्याचे सांगत लोकप्रतिनिधी केंद्रात आणि राज्यात अपयशी असल्याचे त्याच्या वक्तव्यावरुन दिसुन आले.