जनतेज न्युज

महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

प्रतिनिधी : कारण शिवसेनेनं पत्रकार परिषद घेऊन कन्नडीगांना इशारा दिला आहे. बेळगाव महापालिकेसमोरील वादग्रस्त झेंडा हटवा अन्यथा आंदोलन उभा करण्यात येईल. 20 मार्च रोजी पश्चिम महाराष्ट्रातील कन्नड व्यवसायिकांचे व्यवहार बंद करणार असल्याचा इशारा यावेळी दिला आहे. सीमाप्रश्नी शिवसेना आक्रमक झाली असून जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी ही घोषणा केली आहे. २० तारखेला व्यवसाय सुरू ठेवल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा दिला आहे.