प्रतिनिधी , हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील शालेय वस्तू उत्पादक कारखाने सध्या अडचणीत सापडले असून मालक व कामगारावर सुद्धा उपासमारीची वेळ आल्याचे चित्र दिसून येत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील जांभरून (रोडगे)या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सृष्टी एज्युकेशनल उद्योगाला सध्या घरघर लागली असून याठिकाणी शालेय वह्या व रजिस्टर तयार करण्यासाठी आणलेले मटरेल धूळखात पडून आहे
तर या उद्योगावर आपली उपजिवीका भागविणारे 8-10 मजूर हे सध्या व्यवसाय ठप्प असल्याने त्रस्त आहेत
तर हा उद्योग उभारणारे उद्योजक सध्या उत्पादित केलेला माल विकल्या जात नसल्याने चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
जांभरून (रोडगे)येथील महिला उद्योजक सुनिता ज्ञानेश्वर रोडगे यांनी दीड वर्षापूर्वी जांभरून रोडगे या ग्रामीण भागातील गावांमध्ये सृष्टी एज्युकेशनल उद्योग उभारला होता मात्र नेहमीचा लॉकडाउन व त्यातच शाळा बंद असल्याने त्यांनी उत्पादित केलेला मान तसाच धूळ खात पडून राहत असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
