जनतेज न्युज

सांगलीत आज सुंदरनगर वेश्यावस्तीत फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने घुमला गो कोरोनाचा नारा : वारांगना महिलांनी एकत्र येत कोरोना व्हायरस विरोधात लढण्याचा एकमेकांना सल्ला दिला.

प्रतिनिधी , सांगली : फ्रेंडशिप डे चे औचित्य साधत सर्व वारांगना महिलांनी एकमेकांचे हात सॅनिटाईज केले तसेच एकमेकांना मास्क वापरण्याचा सल्ला देत हा फ्रेंडशिप डे साजरा केला. यावेळी महिला आणि मुलींनी एकमेकींना फ्रेंडशिप बँड बांधत कोरोनापासून दूर राहण्याचा सल्ला आपल्या मैत्रिणींना दिला. या अनोख्या आणि हृद्यस्पर्शी कार्यक्रमांत वारांगना महिला मोठ्या संख्यने सहभागी झाल्या होत्या. कोरोना व्हायरस विरोधात लढण्याचा संदेश देणारा फ्रेंडशिप डे सांगलीत साजरा झाला. सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी या विशेष उपक्रमाचे आयोजन केले होते.