प्रतिनिधी , धुळे : कोरोना संसर्गावरील लस काही दिवसात बाजारात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला लसीकरणाचे नियोजन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे धुळे जिल्हा प्रशासनाने लसीकरणाच्या नियोजनाची जय्यत तयारी चालवली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात धुळे जिल्ह्यातील ९ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाणार असून त्यांचा डाटा संकलित करण्याचे काम सुरू आहे.
तर दुसऱ्या दुसऱ्या टप्प्यात स्वयंसेवी संस्था, पोलिस कर्मचारी अशा फ्रंटलाईन वर्करना ही लस दिली जाणार आहे. त्यासाठी त्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. कोरोना वर मात करण्यासाठी ज्या लसीची आपण वाट बघत होतो, ती लवकरच म्हणजे आपल्याला उपलब्ध होणार असल्याचे निर्देश आपल्याला शासनाकडून मिळाले असून, ही लस फ्रंटलाईन वर्करना आधी देण्यात येणार आहे. तसेच लसी साठी कोणीही घाई, अथवा झुंबड करू नये ही लस सर्वांसाठी उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती हिरे मेडिकल कॉलेज च्या अधिष्ठाता डॉ पल्लवी सापळे यांनी दिली.
