प्रतिनिधी , कोलापूर : कोल्हापूरच्या अनुराधा भोसले हे नाव आता महाराष्ट्राबरोबरच जगाच्या पाठीवर अभिमानानं घेतल जातंय. याच कारणही विशेष आहे.. कोल्हापूर जिल्ह्यातील अवनी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बालकामगार , वीट भट्टी कामगारांची मुलं , कचरावेचक महिलांची मुलं अशा वंचित घटकांसाठी मोठे काम केले. खुद्द महानायक अभिताभ बच्चन अनुराधा भोसले यांच्या कामाने प्रेरित झाले आहेत. पाहुयात अनुराधा भोसले यांच्या कार्याची ही संघर्षगाथा..
या आहेत कोल्हापूरच्या सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या अनुराधा भोसले…. गेल्या 27 वर्षापासून अनुराधा भोसले या बालकामगार , वीट भट्टी कामगारांची मुलं , कचरावेचक महिलांची मुलं अशा वंचित घटकांना बालकल्याण अंतर्गत संगोपन करून त्यांना स्वावलंबी करण्याचा पुढाकार त्यांनी घेतला आहे. मूळच्या अहमदनगरच्या असणाऱ्या अनुराधा भोसले या तीस वर्षांपूर्वी कोल्हापुरात आल्या . कोल्हापूर म्हटलं की सामाजिक कामाला आलंच.. आणि याच सामाजिक कामाला वाहून घेत त्यांनी इतरांसाठी समाजकार्याच्या त्या प्रेरणा स्रोत ठरल्या… हे काम दिवस रात्र अखंडितपणे सुरू ठेवलं. त्यासाठी कोल्हापूरकरांची मदत देखील त्यांना मोठी झाली आहे.अनुराधा भोसले…. एवढ्यावरच त्या थांबले नाहीत त्यांनी कोल्हापूर बरोबरच सातारा आणि सांगली येथे देखील सामाजिक काम सुरू ठेवलं. कोल्हापूर जिल्ह्यातील अवनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करताना अवनी बरोबरच एकटी संस्थेच्या माध्यमातून वंचित समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. गेली सत्तावीस वर्ष भोसले या बालकामगारांची सुटका करून त्यांना शिक्षण आणि संगोपनाची जबाबदारी उचलत आहेत. सरकारबरोबरच समन्वय साधून मुलांना शिक्षण देण्यापासून ते स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सरकारी यंत्रणा सक्षम करण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत यात अंतर्गत या बालगृह चालवतात.
व्हीओ-2 हे सगळं सामाजिक कार्य करत असताना कोल्हापूरकरांनी देखील त्यांना भरभरून मदत केली. -आज शेकडो मुलांच्या त्या माता आहेत. अनेकांना त्यांनी रोजगार दिलेला आहे आणि याच अनुराधा भोसले यांच्या कार्याला प्रेरित होऊन महानायक अभिताभ बच्चन यांनी सोनी वाहिनीवरील कोण बनेगा करोडपती या मालिकेत त्यांना निमंत्रित केलं…
