जनतेज न्युज

मीरारोडमधील वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या लॉजिंगवर काशीमीरा पोलिसांची धाड

प्रतिनिधी , मीरा भाईंदर : मीरा रोड पूर्वच्या मीरागावंठाण येथील माय होम लॉजिंग मध्ये अनधिकृत रित्या वेश्याव्यवसाय चालतो अशी गुप्त माहिती मिळाला,काशीमीरा पोलिसांनी धाड टाकून तीन आरोपीना अटक केली असून दोन पीडित महिलेंची सुटका करण्यात आली आहे. मिरागावठाण हनुमान मंदिर जवळ असलेल्या माय होम लॉजिंग मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांना मिळाली,तात्काळ पोलीस कर्मचारी यांना घेऊन लॉजिंग मध्ये बोगस ग्राहकांला पाठवून,हॉटेल चालकांनी रक्कम स्वीकारली असता पोलिसांनी धाड टाकून रंगे हात पकडले. त्यावेळी घटनास्थळी दोन पीडित महिला आढळून आल्या सदर ठिकाणी हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे, दोन पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. आम्हांला गुप्त माहिती मिळाली होती,त्यानुसार टीमने सापळा रचून कारवाई केली आहे यामध्ये तीन आरोपी विरोधात कलम ३७० अनैतिक व्यापार पिटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये दोन पीडित महिलांची सुटका केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली.