जनतेज न्युज

तुमच्या पेक्षा मला अधीक समजतं म्हणून मी एन सी पी मध्ये आलो , भाजपच्या नेत्यांना एकनाथ खडसे यांचा टोला

प्रतिनिधी , जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आज पहील्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा बैठक जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात संपन्न झाली ,या वेळी कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसे यांचा सत्कार केला, या बैठकीत एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले, या वेळी एकनाथ खडसे म्हणाले की मला अधीक समजतं म्हणून मी एन सी पी मध्ये प्रवेश केला, भारतीय जनता पक्षाचे नेते आपल्या पक्षा तून आमदार फुटू नयेत म्हणून कुल्फी किंवा आईस्क्रीम आमदारांना दाखवत आहेत .या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते