प्रतिनिधी , भंडारा : भंडारा तालुक्यातील कोका अभयारण्याला लागुन असलेल्या नवेगाव परिसरात दि.१ डिसेंबर रोजी एका अज्ञात ३० ते ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळु न आल्याने एकच खळबळ उडाली आहे.सदर युवकाची ओळख पटु शकली नाही. अतिमद्य प्राशनाने सदर युवकाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलीस प्रशासना तर्फे व्यक्त केला जात आहे.मात्र नागरिकांमध्ये अनेक चर्चांना उधान आले आहे.
आज भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात सदर मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह पुरण्यात आले.
घटनास्थळाला अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती ,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.काटे,भंडारा स्थानीक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक श्री.चव्हाण,कारधा पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक दिपक वानखडे यांनी भेट देवुन सविस्तर माहिती जाणुन घेतली. कारधा पोलीसांनी अनोळखी मर्ग ३२/२० दाखल केला असुन पुढील तपास सहा.पो.नि.दिपक वानखडे करीत आहेत.
