प्रतिनिधी , कोलापूर : कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण पुढच्या महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. राज्य शासनामार्फत पुढील महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरण करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आरोग्य सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ही माहिती दिली. शिवाय शासकीय आरोग्य सेवेतील सर्वांची नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यामुळें खासगी आरोग्य सेवेतीलसुद्धा सर्वांनी नोंदणी करण्याचे आवाहन देसाई यांनी आज केले आहे.
