प्रतिनिधी : राष्ट्राचं नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता सध्या जर कुणामध्ये असेल तर ती शरद पवार यांच्यामध्ये आहे. प्रश्नांची देशाची जाण लोकांची नाडी खंबीरपणा या सर्व गोष्टी शरद पवार यांच्याकडे आहे. अनुभव दांडगा आहे. असं विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेना काही यूपीएची सदस्य नाही. त्यामुळे मी कस काय याबाबत मत व्यक्त करू? महाराष्ट्रातील महाविकासआघाडीत आम्ही आहोत. पण अद्याप आम्ही यूपीएचे सदस्य नाही. त्यामुळे मी त्यावर मतप्रदर्शन करणार नाही. भविष्यात राजकारणात काय होईल. हे मी आत्ता सांगू शकत नाही.असं देखील यावेळी संजय राऊत म्हणाले.
