जनतेज न्युज

खोट्या प्रसिद्धीसाठी स्वतःचं अस्तित्व पक्षामध्ये जिवंत ठेवण्यासाठी चालवलेला हा उपद्रव – प्रतापसिंह जाधव

प्रतिनिधी, रत्नागिरी : खासदार सोमय्या यांच त्यांच्या पक्षात काय महत्त्व आहे, खोट्या प्रसिद्धीसाठी स्वतःचं गमावलेलं अस्तित्व पक्षामध्ये जिवंत ठेवण्यासाठी चालवलेला हा उपद्रव आहे, सातबारे कोरे करायला तो काय तलाठी आहे का असं म्हणत जाधव यांनी सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान शिवसेना नेते मंत्री अनिल परब यांच्यावर पडलेल्या ईडीच्या धाडीसंदर्भात खासदार जाधव म्हणाले की,  महाराष्ट्रात जेव्हापासून भारतीय जनता पक्षाच्या हातून सत्ता गेली, तेव्हापासून त्यांनी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आता सुद्धा ज्या धाडी पडतायेत त्या जाणीवपूर्वक शिवसेनेला बदनाम करण्यासाठी आहेत, असं जाधव यावेळी म्हणाले राज्यसभेसाठी संभाजी राजेंना जागा देण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितल  होतं ह  जागा शिवसेनेची आहे आणि तुम्ही शिवसेनेच्या माध्यमातून ही जागा घ्या त्यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीची तयार  होती असं संजय राऊत यांनी देखील सांगितल  होतं त्यांच म्हणनं होतं की मी अपक्ष राहीन.राज्यसभेत पक्षाची काही ध्येय धोरणं मांडण्यासाठी पक्षाच्या ध्येयधोरणानूसार  भूमिका घेण्यासाठी पक्षाची अधिकृत लोकं लागताच आणि ते अधिकृत भूमिका घेऊ शकतात म्हणून सेनेचा आग्रह होता की त्यांनी उमेदवारी घ्यावी निश्चित ते खासदार झाले असते शिवसेना राजांच्या विरोधात नाही महाविकास आघाडी राजांच्या विरोधात असण्याचं कारण नाही.पक्षाचं संख्याबळ असंत ते तिथल्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या कामावर अवलंबून असंत म्हणून सेनेचा एवढाच आग्रह होता की त्यांनी सेनेची  भूमीका त्यांनी मांडावी त्यांना उमेदवारी देण्याबाबत त्यांना विरोध नव्हता. असं शिवसेनेचे खासदार प्रतापसिंह जाधव यांनी रत्नागिरीत पत्रकरांशी बोलताना सांगितल आहे.