जनतेज न्युज

गावाच्या विकासासाठी गावकरी एकत्र येत असतील तर त्याला आमचं समर्थन असेल- भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

प्रतिनिधी , नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी गावातील सरपंच पदासाठी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 42 लाख रुपयांची बोली लावलेली असून जस जशी ग्रामपंचायत निवडणूक जवळ येत आहे, तस तशी ही निवडणूक चर्चेचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या बोलीला गावकऱ्यांनी समर्थन दर्शविले आहे. कारण, या 42 लाखाच्या निधीतून गावातील वाघेश्वरी माता मंदिराचा प्रलंबित असलेला प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी एकत्र येवून या निर्णयाला समर्थन असल्याचं सांगितलं आहे. याबाबत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांना विचारणा केली असता, त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बोली लावल्याने सत्ता राष्ट्रवादीकडे जात नाही, हा निर्णय गावकर्‍यांचा असून मंदिर निर्माण करण्यासाठी गावकरी व हिंदू समाज एकत्र येत असेल तर त्याला आमचा पाठिंबा आहे असे त्यांनी सांगितले.