जनतेज न्युज

..तर महाराष्ट्र या तीन पक्षांच्या सरकारला कधीही माफ करणार नाही – आ.राम कदम

प्रतिनिधी , मुंबई : भारत मातेचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची भाषा हे महाराष्ट्रातील तीन पक्षाचं सरकार करतंय,अशी प्रतिक्रिया भाजप आमदार राम कदम यांनी दिली आहे.देशाचे तुकडे करणाऱ्यांवरील केसेस मागे घेण्याची भाषा हे सरकार कसं काय करू शकतं असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केलाय.याचसोबत जर या केसेस मागे घेतल्या तर, महाराष्ट्र या तीन पक्षांच्या सरकारला कधीही माफ करणार नाही,असा इशारा राम कदम यांनी दिला आहे.