प्रतिनिधी , मुंबई : भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी आर्थिक गोष्टींवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टिकास्त्र उगारलं आहे. सोमय्या यांनी, ‘एचडीआयएलने पीएमसी बँकेचे पाच हजार चारशे कोटी रुपये ढापले आहेत.एचडीआयएल आणि प्रविण राऊत यांचे कोट्यवधींचे आर्थिक संबंध आहेत,व्यवहार आहेत.प्रवीण राऊत परिवार आणि संजय राऊत परिवाराचेही आर्थिक संबंध आहेत.त्यामुळे प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे,अशी टिका केली आहे.
