प्रतिनिधी , जळगाव : भुसावळ शहरांमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे खून चोऱ्या , दरोडे ,मारामारी, यामुळे भुसावळ शहरात दहशतीचे वातावरण सतत निर्माण होत असते या पार्श्वभूमीवर भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी नवीन कल्पना ऐकून शहरातील सर्व गुन्हेगारांना आज एकत्र बोलावले आहे गुन्हेगारांना गुन्हेगारी पासून प्रवृत्त होऊन चांगले जीवन जगावे यासाठी आज बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये मार्गदर्शन करण्यात आले आज बोलावण्यात आलेले गुन्हेगार हे विविध गुन्ह्यातील आरोपी होते, पोलीस डायरी मध्ये या मोठ्या गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत अशा गुन्ह्यातील सर्व आरोपींना बाजारपेठ पोलिस ठाण्यांमध्ये बोलवण्यात आले होते यावेळी या आरोपींना डी वाय एस पी सोमनाथ वाघचौरे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी मार्गदर्शन केले व गुन्हेगारी जगतातून बाहेर पडण्याच्या पोलिसीभाषांमध्ये सक्त सूचनाही दिल्या यावेळी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र बिराडे रमण सुरळकर किशोर महाजन उमाकांत पाटील विकास सातदिवे श्रीकृष्ण देशमुख प्रशांत परदेशी चेतन ढाके सुहास सावळे उपस्थित होते
