प्रतिनिधी , यवतमाळ : महागाव तालुक्यातील बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणीने कोरोना संसर्गजन्य काळात मंदीची लाट असतानासुद्धा सूत उत्पादनात गगन भरारी घेतली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही सूतगिरणी दुसऱ्या क्रमांकावर आली असून विदर्भात ही सुतगिरणी पहिल्या क्रमांकावर आहे.यामुळे या सूतगिरणीने दर्जेदार सुताची निर्मिती केल्यामुळे या सुतला विदेशातून मोठी मागणी होत आहे. या गिरणीच्या दर्जदार सुताची निर्यात सातासमुद्रापार केली जात आहे.
बाबासाहेब नाईक सूतगिरणीने उपलब्ध असलेल्या टीएफओ या अद्ययावत यंत्रवर तयार करण्यात आलेल्या १६ अकाउंटच्या दर्जेदार सुतास मंदीच्या काळातही मोठी मागणी असल्यामुळे एकूण दहा कंटेनरद्वारा २०० टन सुताची मागणी चीन व हॉगकॉग या देशातून नोंदविण्यात आली आहे. जास्त भाव मिळत असल्याने गिरणीच्या व्यवस्थापनाकडून सुत निर्यातीला प्राधान्य दिले जात आहे. कोरोना संसर्गजन्य काळातही गिरणीच्या व्यवस्थापनाकडून एक पाऊल पुढे टाकले असून. संस्थेचे मार्गदर्शक माजी मंत्री मनोहर नाईक, गिरणीचे उपाध्यक्ष ययाती नाईक, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक एम.आय. पाथरी, कामगार संघटनेचे अध्यक्ष यांच्या सहकार्याने बाबासाहेब नाईक सूतगिरणीचे टाळेबंदी नंतर तीन पाळ्यात पूर्ण क्षमतेने सूत उत्पादन सुरू आहे. विशेष म्हणजे कामगारांच्या सहभागातून ८९ टक्के उत्पादन क्षमतेचा वापर होत आहे. मुख्य म्हणजे या टाळेबंदी काळात गिरणी बंद असताना सूतगिरणी संचालक मंडळाने कामगारांना ५० टक्के वेतन दिले आहे. कामगारांना अडचणीच्या काळात मदत केली आहे. परिणामतः कामगारांच्या सहभागातून सुतगिरणीतील दर्जेदार सूत उत्पादनात भरीव वाढ झाल्यामुळे कामगारांना एवढ्या मंदीच्या काळात सुद्धा दिवाळी बोनस म्हणून नऊ टक्के वाढीव बोनस देण्यात येत आहे.
त्यामुळे सर्व कामगारांची दिवाळी चांगली होणार असल्यामुळे कामगार आनंद व्यक्त करीत आहेत एकीकडे अनेक सूतगिरण्या बंद पडत असताना विदर्भातील बाबासाहेब नाईक सूतगिरणीने पूर्ण कार्यक्षमतेने विदर्भ पहिला क्रमांक मिळविला आहे. गिरणीचा आलेख उंचावण्यासाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी विविध योजनांचा आराखडा तयार केला आहे.
जुन्या मशिनरी बदलून नवीन अद्ययावत मशिनरी बसविण्यात आली. अनेक अडचणींचा सामना करावा लागला. टाळेबंदी काळात गिरणी बंद असताना सूतगिरणी संचालक मंडळाने कामगारांना ५० टक्के वेतन दिले
