जनतेज न्युज

गुरु पौर्णिमेनिमित्त अक्कलकोट स्वामी समर्थांच मंदिर भक्तांविना सूनसून

प्रतिनिधी , सोलापूर : गुरु पौर्णिमेनिमित्त प्रत्येकवर्षी सोलापुरातील अक्कलकोट मधील श्री स्वामी समर्थ मंदिरात भाविकांचा लाखोंचा मेळा भरलेला असतो,
मात्र गतवर्षीप्रमाणे यावर्षी ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट मंदिर बंदच आहे.
त्यामुळे महाराष्ट्र तसेच कर्नाटक,आंध्र,तेलंगणातून येणाऱ्या भाविकांना यंदा स्वामींच्या दर्शनापासून मुकावं लागणार आहे.
अक्कलकोट तालुका आणि शहरात पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.