प्रतिनिधी , कोल्हापूर : पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आंबेवाडी चिखली त्याचबरोबर नदीकडच्या गावातल्या लोकांचे स्थलांतर सुरू झालय.. नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे परिस्थिती गंभीर बनू शकते अशी भीती एनडीआरएफच्या टीमचे प्रमुख ब्रिजेश कुमार रैकवार यांनी व्यक्त केलीय… आंबेवाडी आणि चिखली गावातील 80 टक्के लोक बाहेर पडले असले तरी अजूनही काही लोक अडकून पडले आहेत त्यांना बाहेर काढत आहोत.. गरज भासल्यास आणखी टीम मागवली जाईल अशी माहिती त्यांनी RNO शी बोलताना दिलीय…
