प्रतिनिधी, नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपर खैरणे सेक्टर 1 मधील SH टाईप रूम नंबर 61 मध्ये सिलेंडरचा स्पोट झाला असून वैशाली भिसे वय 40 ही महिला जखमी झाली.
महिलेने सिलेंडरला जोडणी केलेली शेगडी खाली घेऊन स्वयंपाक करत असताना, रेगुलेटर मधून गॅस लिक झाला,महिलेला काहीच कळाले नसल्याने,चालू गॅस च्या आगीचा संपर्क लीक गॅस सोबत झाला,आणि गॅस चा स्पोट झाला.
त्यामुळे तिचा चेहरा आणि हात जळाला,त्यामुळे तिला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,तिची प्रकृती स्थिर आहे.महिला सुदैवाने वाचली असली तरी,घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाले आहे.ही घटना आज दुपारी साडेबारा च्या दरम्यान घडली.
