जनतेज न्युज

मंत्रिमंडळाचा विस्तार 11 जुलैनंतर होण्याची शक्यता – आ. किशोर जोरगेवार

प्रतिनिधी, चंद्रपूर : राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडीनंतर बारा दिवसांनी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आज घरी परतले. शिंदे गटासोबत ते राहिले आणि सरकारला समर्थन पण दिले. आधी ठाकरे सरकार आणि आता शिंदे सरकारसोबत ते गेले. त्यांच्या या बदलत्या भूमिकेवर स्थानिक पातळीवर समाजमाध्यमात मोठी टीका झाली. त्याला आज त्यांनी उत्तर दिले. शिंदे यांच्यासोबतचा दहा दिवसांचा काळ आनंददायी आणि शिकण्यासारखा होता, असे सांगत मी टीकेला आणि धमक्यांना घाबरत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मंत्री बनण्याची इच्छा नाही आणि तशी राजकीय परिस्थितीसुद्धा नाही, अशी कबुली देत मंत्रिमंडळाचा विस्तार 11 जुलैनंतर होण्याची शक्यता त्यांनी फडणवीस यांच्याशी बोलल्यावर व्यक्त केली.