प्रतिनिधी , पुणे : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन असल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे तसेच इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने पुण्यासारख्या शहरांमध्ये अडकून पडले आहेत. लॉकडाऊन मुळे सर्व हॉटेल, खानावळी बंद असल्या कारणाने विद्यार्थ्यांचे जेवणाचे खूप हाल होत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जेवणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या “सृजन फौंडेशन” व “एमपीएससी स्टुडंट राईट” च्या पुढाकाराने विध्यार्थ्यांची गैरसोय ओळखून मोफत जेवण व्यवस्था सुरू केली आहे.
