रस्ता बांधकामात भ्रष्टाचाराचा आरोप
प्रतिनिधी , भंडारा : भंडारा शहरातील पोस्ट ऑफिस चौक ते जिल्हा रुग्णालय दरम्यान रस्त्याचे सुरू असलेले बांधकाम जय जवान जय किसान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज दि.15 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान बंद पाडले.
सदर रस्ता बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन घन मारे यांनी केला.
