जनतेज न्युज

कार ट्रॅक्टर च्या धडकेत 4 मित्रांचा मृत्यु, 1 गंभीर जख्मी.

मित्राच्या वाढदिवाची पार्टी ठरली शेवटची
प्रतिनिधी , चंद्रपुर : आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करुन परत येत असतांना चंद्रपुर-मुल मार्गावर अजयपुर जवळ एका ट्रॅक्टरला धडक दिल्याने 4 जण जागीच ठार तर एक गंभीर झाल्याची दुदैवी घटना घडली असुन मुल शहर दुःखाच्या विळख्यात आहे.
मुल येथील प्रतिष्ठीत व्यावसायीक हिरेन शाह यांचा मुल योग याचा 19 वा वाढदिवस साजरा करण्याकरीता आपल्या दोन मित्र आणि दोन मैत्रीणी सोबत वलनी येथील एका हाॅटेलमध्ये गेले, परत येत असतांना रा़त्रो साडे दहा वाजताच्या सुमारास अजयपुर गांवाजवळ एका शेतातून तणीस घेवून निघत असलेल्या ट्रॅक्टरला कारने जोरदार धडक दिल्याने अमन समिर शेख, सुमीत राजु पटेल, दर्शना विष्णु उधवानी, प्रगती विजय निमगडे हे जागीच ठार झाले तर योग शाह हा गंभीर जख्मी झाला असुन त्याला चंद्रपुर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असुन उपचार सुरु आहे. अपघात इतका भिषण होता कारचा चकनाचुर असून हया घटनेची माहिती होताच मुल शहरात शोककळा पसरली आहे. चारही मृतदेह शवविच्छेदना करीता चंद्रपुर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आले. कार योग शाह चालवत असल्याचे समजते. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.