जनतेज न्युज

मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या, अन्यथा 2 सप्टेंबर पासून राज्यव्यापी आंदोलन करणार -आमदार विनायक मेटे

प्रतिनिधी ,जळगाव : राज्य सरकारच्या अनास्थेमुळे मराठा समाजाचे आरक्षण रखडले असल्याचा आरोप करत तात्काळ आरक्षण देण्यात यावे अशी मागणी शिवसंग्राम संस्थेचे संस्थापक आ. विनायक मेटे यांनी केले. ते आज जळगाव दौऱ्यावर आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते. जर ही मागणी मान्य न झाल्यास दोन सप्टेंबर पासून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही आमदार विनायक मेटे यांनी यावेळी दिला आहे.