प्रतिनिधी , भुसावळ :-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून देखील जामनेर येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांची मात्र कोवीड सेंटर कडे दुर्लक्ष झाले आहे जामनेर पळासखेडा येथील कोवीड सेंटर मधील दाखल कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची हेळसांड होत असून तीन दिवसापूर्वी कोविड सेंटरमध्ये दाखल अपंग रुग्णांची देखील प्रकृती खालावली आहे या तीन दिवसांमध्ये त्याची साधी विचारपूसही कोणत्याच डॉक्टरांनी केली नसल्याचे या रुग्णाने सांगितले आहे या कोविड सेंटरमध्ये सकाळ-संध्याकाळ डॉक्टर नर्स व्हिजिटला येतात परंतु फक्त रुग्णांची हजेरी घेण्यासाठी रुग्णांच्या तपासणीसाठी वापरण्यात येणारे उपकरण हे बंद स्थितीत असतानासुद्धा रुग्णांचे दैनंदिन अहवाल कागदोपत्री पूर्ण असल्याचे दाखल रुग्णांच्या तोंडून समजते आहे त्याच बरोबर रुग्णांच्या आहाराबाबत म्हणा किंवा सेंटरमधील स्वच्छतेबाबत ची विचारणा संबंधित अधिकाऱ्यांना केली असता सर्व अधिकारी कर्मचारी एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडत असून त्यामुळे रूग्णांच्या होणाऱ्या गैरसोयींमुळे आणि वारंवार तक्रार करून देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या संतप्त रुग्णांनी अखेर सेंटर मधून काढता पाय घेतला आहे त्यामुळे आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण खुलेआम फिरणार का आणि फिरणार तर यामुळे जर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली तर याला जबाबदार कोण
या क्वारंटाईन सेंटरमध्ये सुमारे 50 रूग्ण दाखल होते, त्यापैकी पंधरा रुपये सुविधांच्या अभावाची कारणे देत या ठिकाणाहून फरार झाले आहेत या फरार रुग्णांवर ती गुन्हा दाखल करून त्यांचा तपास पोलीस करत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी विनय सोनवणे यांनी दिली आहे.
