जनतेज न्युज

सोलापुरात बॅरल गोडाऊनला भीषण आग

प्रतिनिधी , सोलापूर मधील जोडभावी पेठ परिसरातील रिकाम्या बॅरेलच्या गोडाऊनला भीषण आग लागली,
या आगीमुळे संपूर्ण परिसरामध्ये धुराचे लोट पहायला मिळाले,
शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातं आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने अनर्थ टळला.
अग्निशमन दलाला आग विझवण्यामध्ये यश आलेले आहे.
विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच गोडाऊनचे वीज कनेक्शन महावितरणने बंद केले होते.