प्रतिनिधी, पुणे :
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही आळंदी आणि देहू येथून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा पार पडणार आहे. पुणे जिल्ह्यातील एखाद्या दोन पालख्यांसोबत दोन मानाच्या पालख्या सासवडमधून निघत असतात. त्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने त्याची पूर्ण तयारी केलेली आहे. अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी दिली आहे.
पालखी मार्गावर असणारे अडथळे दूर करणे असो, रस्त्याच्या साइडपट्ट्या भरणे असो, विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणची सोयी सुविधा यासर्व झालेल्या आहेत. त्याची नुकतीच चाचणी जिल्हा प्रधासनाकडून करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनातर्फे 1200 पोलीस कर्मचारी, आणि 120 पोलीस अधिकारी या पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. त्याचबरोबर 1000 होमगार्डस आणि दोन एसआरपीएफच्या कंपनी देखील मिळाल्या असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे.
पुणे ग्रामीणचा बंदोबस्त 1800 च्या आसपास असणार आहे.होमगार्ड धरून 2800 च्या आसपास बंदोबस्त असणारा आहे.
ड्रोन बाबत..
पोलिसां तर्फे ड्रोन घेण्यात आला असून शासनाच्या परवानगी शिवाय ड्रोन कुणालाही उडवता येत नाही. त्यामुळे वारीच्या काळात ड्रोन उडववायचे असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे.
सुरक्षिततेबाबत…
आरोग्यवारीबरोबरच आमचे निर्भया पथक तयार असतात. याशिवाय साध्या वेशातील स्कॉड देखील ठेवण्यात आले आहेत. वारीतील चॅन सँचिंग, चोरीचे प्रकार टाकळण्यासाठी ही पथक तयार असल्याचेही देशमुख म्हणाले आहेत. यावर्षी वारीमध्ये महिलांसाठी 15 किमीच्या अंतरावर महिलांसाठी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय महिलांच्या मासिक पाळीसाठी वेंडिंग मशीन आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मशीन आशा नवीन गोष्टी ऍड करण्यात आल्या आहेत. भाविकांना को तीही अडचण होणार नाही यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत.
वाहतुकीबाबत…
वाहतुकीबाबत नियोजन करण्यासाठी त्याबाबत व्हिडीओ तयार करण्यात आले असून आज संध्याकाळपर्यंत ते प्रसारीत केले जातील. यात कुठले मार्ग बंद राहणार आहेत, वाहतूक कुठल्या बाजूनं वळवण्यात आली आहे. यातील नकाशावरून समजण्यास मदत होईल, पालखी मार्गाची पाहणी करण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांसपासून सर्वानी याची पाहणी केली आहे.
