जनतेज न्युज

ठाणे महापालिकेच्या आश्वासना नंतर गटई कामगार यांचे उपोषण घेतले मागे

प्रतिनिधी , ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून ठाणे महापालीका  मुख्यालयासमोर गटई कामगार आपल्या विविध मागण्यां साठी  उपोषणाला बसले होते अखेर आज महापालिकेतील अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले याच्या सोबत झालेल्या बैठकीत महापालिका क्षेत्रातील शासन मान्यता देण्यात आलेल्या कुठल्याही स्टोल वर कारवाई केली जाणार नाही असे लिखीत स्वरुपात पत्र दिल्या नंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.