प्रतिनिधी, मुंबई : राज्यात सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे आणि या परीक्षेत पेपर फुटी चे प्रकार समोर आले आहेत याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील घरासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या आंदोलकांनी केली पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेऊन धारावी पोलीस स्टेशनला नेलं वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा अशी प्रमुख मागणी या कार्यकर्त्यांनी केली
