प्रतिनिधी , ठाणे : 31 डिसेंबरला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येते. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वात जास्त कारवाईही ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत करण्यात आली आहे. ठाण्याच्या वाहतूक पोलिसांनी रात्रभर चेक पोस्टवर तपासण्या करून तब्बल 623 जणांवर कारवाई केली आहे. मुख्य म्हणजे या तळीरामां सोबत असलेल्या सह प्रवाशांवर देखील काल कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून माननीय न्यायालयाने 12 लाख 46 हजार इतका सर्वाधिक दंड देखील वसूल केला आहे. तर 25 तारखेपासून सुरू असलेल्या या मोहिमेमध्ये तब्बल चौदाशे जणांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. ठाणे वाहतूक विभागाच्या हद्दीत ठाणे शहरापासून ते बदलापूर शहरात पर्यंतचा विभाग येतो. या संपूर्ण विभागात 54 चेक पोस्ट तयार करून नववर्षाच्या पूर्वसंध्येला कसून तपासण्या करण्यात आले आहेत.
