जनतेज न्युज

समस्त जनतेला येणारे वर्ष सुखाचे जावो अशा एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा.. घोषित सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचा केला संकल्प..

प्रतिनिधी, मावळते वर्ष सर्वाना अत्यंत त्रासाचे आणि संकटाचे गेले परंतु येणारे वर्ष हे सर्वाना आनंदाचे जावो अशा शुभेच्छा राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. ठाण्यातील मेट्रो प्रकल्प आणि रखडलेला क्लस्टर प्रकल्प लवकरच मार्गी लावून ठाणेकरांना दिलेला शब्द पूर्ण करू असे ते म्हणाले. बरीच वर्षे रेंगाळलेला औरंगाबाद चा नामकरण प्रश्न बाबत औरंगाबाद येथील नामकरण झाले पाहीजे अशी स्थानिकांची मागणी आहे ..कायदेशीर बाबी रीतसर पूर्ण करून या बाबी विचारात घेउन या बाबत छत्रपती संभाजी महाराज हे नाव देण्यासाठी सरकार सहमत आहे.नक्कीच गेल्या अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न बाबत मूर्त रूप देण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे… महाविकास आघाडी मध्ये कोणतीही नाराजी नाही हे सरकार कॉमन मिनिमम प्रोग्राम वर हे सरकार काम करीत आहे..सर्वसामान्य जनतेसाठी हे सरकार काम करत आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि ते कायम राहील अबाधित राहील असे सूतोवाच त्यांनी केले. कोरोनाकाळात रक्ताचा तुटवडा भासत आहे त्यासाठी सर्वजण रक्तदान करत असून इतरांनी देखील पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.

शिंदे हे ठाण्यातील कोरोना योद्धा चा सत्कार करण्यासाठी आले होते…