जनतेज न्युज

इस्लामपुरच्या प्रकाश हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये भारत बायोटेकच्या को-व्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या चाचणीचे 1 हजार डोस उपलब्ध

प्रतिनिधी, सांगली: हैद्राबादमधील भारत बायोटेकने कोरोना प्रतिबंधक म्हणून विकसित केलेली को-व्हॅकसिन या लसीच्या तिसऱ्या चाचणीसाठी देशातील अग्रगण्य 26 मेडिकल हॉस्पिटलची निवड केली असून त्यात इस्लामपूरमधील प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेन्टरचा समावेश आहे . या हॉस्पिटलला 1 हजार लसी देण्यात आल्या असून 30 वर्षावरील व्यक्ती, महिला आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्यांची या लसीची चाचणी देण्यासाठी निवड करण्यात येत आहे. येत्या आठवड्यामध्ये एक हजार स्वयंसेवकांना ‘को – व्हॅक्सिन’चे लसीकरण चाचणी करून त्याचा अहवाल भारत बायोटेकला पाठविण्यात येणार आहे.ही लस सहा ते आठ अंश सेल्सियस तापमानामध्ये ठेवणे आवश्यक असून तशी यंत्रणा प्रकाश हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आली आहे.