जनतेज न्युज

डॉ.बी .आर .आंबेडकर फाउंडेशन नांदेड तर्फे दिला जाणारा कृष्णाई पुरस्कार सोहळा संपन्न

प्रतिनिधी , नांदेड : गेली 19 वर्ष डॉक्टर बी आर आंबेडकर फाउंडेशन तर्फे दिला जाणारा कृष्णाई पुरस्कार सोहळा आज कुसुम सभागृह येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरण करण्यात आले पुरस्काराचे मानकरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार. सौ राजश्रीताई हेमंत पाटील. राज्यस्तरीय कृष्ण कृष्णाई पुरस्कार झी24तास चे श्री आशिष जाधव. जिल्हास्तरीय कृष्णाई पुरस्कार दैनिक देशोन्नती चे पत्रकार संभाजी सोनकांबळे. जिल्हास्तरीय कृष्णाई पुरस्कार प्रेस फोटोग्राफर सचिन डोंगरकर . यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे सर. माजी पालकमंत्री डी पी सावंत आमदार अमर राजूरकर बालाजी कल्याणकर मोहनराव हंबर्डे. महापौर मोहिनी ताई यवनकर. बांधकाम सभापती संजय बेळगे मनपा सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले. आदी मान्यवर उपस्थित होते पुरस्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर संयोजक बापूराव गजभारे यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली