प्रतिनिधी , कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महत्वपूर्ण ठरलेला मागासवर्ग आयोग घटनात्मक नाही म्हणणाऱ्या विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा देण्याची मागणी भाजापचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय.वडेट्टीवार हे मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.कोल्हापुरात मराठा समाजाच्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला.त्यावेळी ते बोलत होते.तर विजय वडेट्टीवार याना काळे फसणाऱ्यांना मराठा समाज मराठा भूषण पुरस्कार देऊन गौरव करेल असे आवाहन आंदोलक सचिन तोडकर यांनी केले.दरम्यान यावेळी वडेट्टीवार यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला यावेळी पोलीस आणि आंदोलकांच्यात मोठी झटापट उडाली
