जनतेज न्युज

डोंबिवली एमआयडीसीच्या नाल्यात पुन्हा केमिकल मिश्रित पाणी

प्रथिनिधी, कल्याण : डोंबिवली एमआयडीसी परिसरात नाल्यात केमिकल आणि केमिकल मिश्रित पाणी वारंवार सोडल्याचे दिसून आले आहे.अशी घटना आज पुन्हा घडली असून नाले मधील पाणी हिरवे झाले होते.यामुळे परिसरात उग्र वास पसरला होता.आज सकाळी आणि दुपारी  फेज 2 मधील स्टार कॉलनी आणि गणेश नगर येथील नाल्यात केमिकलचे पाणी सोडलेले असल्याने नाल्यातले पूर्णपणे हिरवे झाले आहे.नाल्यात केमिकलचे सोडल्यामुळे परिसरात वास सुटला असून डोळे चुरचुणे, मळमळणे यांसारखे त्रास होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. डोंबिवली एमआयडीसीमध्ये वारंवार अश्या घटना घडत असतात मात्र नागरिकांचया त्रासात भर पडत असून नागरिक त्रस्त झाले आहेत तर प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र पाहणी पलीकडे काहीच ठोस कारवाई करत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.