प्रथिनिधी, नागपूर : कोरोना काळात नागपूर कारागृहातुन पॅरोल वर पाठविण्यात आलेल्या कैद्यांना परत कारागृहात आणण्यासाठी नागपूर पोलिसांची विशेष मोहीम सुरू, 360 कैद्यांना हुडकून काढून कारागृहात टाकण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले असून कैद्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे । कैद्यांनी कारागृहात परत येण्याचे आवाहन नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. विशेष म्हणजे कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्या मुळे कारागृहातील काही कैद्यांना पॅरोल वर पाठविण्यात आले होते । मात्र कोरोना संकट टळल्या नंतर त्या कैद्यांना परत येण्याचे आदेश देण्यात आले असतांनाही नागपुर कारागृहातील तब्बल 360 कैदी कारागृहात परत आले नाही । या फरार कैद्यांची आता पोलिसांकडून धरपकड केली जात आहे.
