प्रथिनिधी, अकोला : अकोला महानगर पालिका चे कारभार पूर्णतः ढेपळले असून याचा त्रास शहरातील सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे, अकोला मनपा तर्फे अकोला शहरातील नाले सफाई पावसाळ्या पूर्वी करायला पाहिजे, परंतु अद्याप अकोला शहरातील बहुतांश भागातील नाले सफाई न झाल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, विशेष म्हणजे मागील वर्षी मनपा प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नाले सफाई न केल्याने अकोला शहरातील बहुतांश नागरिकांच्या घरात नाल्याचे पाणी शिरल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते, काही शिवसेना चे नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी नाले सफाई बाबत विचारणा केली असता आयुक्तांच्या मते शहरातील 90 टक्के नाल्याचे साफसफाई केली आहे परंतु अशा प्रकारची नाले सफाई शहरात झाली नाही असा दावा शिवसेना चे माजी नगरसेवक राजेश मिश्रा यांनी व्यक्त केला, तसेच येनाऱ्या काळात पावसाळ्या पूर्वी मनपा प्रशासनाने शहरातील संपूर्ण भागातील नाले सफाई न केल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोनल छेडणार असल्याची माहिती शिवसेना चे माजी नगर सेवक राजेश मिश्रा यांनी पत्रकार परिषद मध्ये माहिती दिली.
