जनतेज न्युज

डोंबिवली वाहतुक पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा !

दिवसभरात दंड चुकव्यांकडून 25 हजारांची दंड वसुली हजाराचा दंड वसूल

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : डोंबिवली मध्ये वेगवेगळ्या भागात वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालक,वाहतुकेचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. सदरच्या कारवाईत ज्यांच्या वाहनावर अगोदर पासून ऑनलाइन दंड आहे पण अजून भरलेला नाही अशाकडून देखील दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे व अजून या पुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे डोंबिवली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. एन.जाधव यांच्याकडून सांगण्यात आले.