प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : ठाण्यापुढील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे कामही अंतिम टप्प्यात आले असून वेळापत्रकानुसार जून २०२१ मध्ये या मार्गिका प्रवाशांचा सेवेत दाखल होतील अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. तसेच
चिखलोली रेल्वे स्थानक, कल्याण येथील लोकग्राम पुल, कल्याण यार्ड रिमॉडेलिंग, कळवा-ऐरोली दरम्यान एलिव्हेटेड रेल लिंक, कोपर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्म याबाबत रेल्वेशी चर्चा करत
कामात दिरंगाई करू नका अशा सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्या आहेत .
मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसमवेत खासदार डॉ. शिंदे यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत ठाण्यापुढील प्रवाशांसाठी महत्त्वाच्या प्रकल्पांच्या पूर्ततेत कुठलीही दिरंगाई करू नका, अशी सूचना खासदार शिंदे यांनी केली. ठाणे-दिवादरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका, चिखलोली रेल्वे स्थानक, कल्याण येथील लोकग्राम पुल, कल्याण यार्ड रिमॉडेलिंग, कळवा-ऐरोली दरम्यान एलिव्हेटेड रेल लिंक, कोपर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्म अशा विविध प्रकल्पांबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली.ठाण्याच्या पुढील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाचव्या व सहाव्या मार्गिकांचे कामही प्रगतिपथावर असून वेळापत्रकानुसार जून 2021 मध्ये या मार्गिकांवरून प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. पारसिक येथून खाडीच्या दिशेने जाणाऱ्या एलिव्हेटेड मार्गिकांचे काम जवळपास 85 टक्के पूर्ण झाले असून महत्त्वाच्या गर्डरचे लाँचिंग पुढील महिन्यात होणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. या मार्गिका प्रवासी सेवेत दाखल झाल्यानंतर ठाण्यापुढील प्रवाशांसाठी किमान 50 ज्यादा फेऱ्या सुरू करता येतील आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळनार असल्याचे खासदार शिंदे सांगितले .कल्याण पूर्वेच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लोकग्राम पुलाच्या पाडकामाला लवकरच सुरुवात होऊन 31 जानेवारी 2021 पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. हे पाडकाम सुरू असतानाच नव्या पुलाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबवा, जेणेकरून पाडकाम पूर्ण होताच नव्या बांधकामाला सुरुवात करता येईल अशी सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेला केली याबाबत रेल्वेने सकरात्मक प्रतिसाद देत या पुलासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे लवकरच रेल्वेकडे ७८ कोटी रुपये जमा केले जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले
