जनतेज न्युज

दोन दिवसांचे अधिवेशन मलाही मान्य नाही. अधिवेशन हे लोकशाही ने दिलेलं सर्वात मोठं आयुध आहे

प्रतिनिधी , पंढरपूर : पण या महामारीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याबाबत एक प्रस्ताव तयार केला जातोय. जिल्हाधिकारी कार्यालयात काही लोकप्रतिनिधी आणि काही विधीमंडळात बसवून ऑनलाईन अधिवेशन घेण्याचा विचार सुरू आहे . सत्ताधारी आणि विरोधक सदस्य असलेल्या विधीमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत दोन दिवसांच्या अधिवेशनाचा प्रस्ताव मंजूर झाला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र दोन दिवसांचे अधिवेशन लोकशाही ला पोषक नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
दिल्लीत कडाक्याच्या थंडीत बळीराज लढतोय. केंद्र सरकारने बैठकीच्या फेऱ्या ना घेता प्रधानमंत्री मोदींनी पुढे येऊन चर्चा करावी आणि हा प्रश्न मार्गी लावावा. मी ज्यावर 2017 मध्ये आवाज उठवला त्याचा विषयावर आज दिल्लीत शेतकरी लढतोय.
पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेत थोडा घोळ झालाय. संचाराबंदी करताना चूक झाल्याच्या तक्रारी मला प्राप्त झालेल्या आहेत . त्यावर लवकरच आपल्या दालनात बैठक घेऊन आढावा घेतला जाईल आणि चूक झाली असल्यास संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करण्याचे सूतोवाच त्यांनी दिले .
तसेच महाराष्ट्राचे वैभव असलेली चंद्रभागा नदीत सध्या वाळू माफियांनी पोखरली आहे. यावर देखील बैठक घेऊन अवैध वाळू उपशावर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील विधान परिषदेच्या जागांवर महाविकास आघाडी चा विजय हा लोकशाहीचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले.