प्रतिनिधी , जळगाव : एकि कडे कोरोनाचा फटका दुसरी कडे विजबिलाचा फटका तर आता थकबाकीचा फटका भुसावळकरांना बसला आहे . जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपालिका नाशिक विभागात अ वर्गाची नगरपालिका
आहे .मात्र शहरातील नागरीकांकडे पाणीपट्टी ,घरपट्टी मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे हि थकबाकी वसुली करण्यासाठी आज मुख्याधिकारी संदिप चिद्रेवार हे स्वतः नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर उतरले असल्याचे पहावयास मिळाले मोठ्या थकबाकीदारांच्या दारापुढे बँड वाजवुन थकबाकी वसुल केली जात आहे .त्यामुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली असल्याचे दिसून आले .
नाशिक विभागात भुसावळ नगरपालिकेची करवसुली अत्यल्प आहे फक्त वीस टक्केच कर वसुली होत असून ऐंशी टक्के नागरिक टॅक्स भरत नसल्याचे मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार यांनी म्हटले आहे सर्वांनी टॅक्स भरल्यास चांगल्या सुविधा देता येतील असेही ते म्हणाले .शहरातील शंभर लोकांकडे लाख रूपयांची थकबाकी आहे . अशांवर तातडीने कारवाई करण्यात येईल असेहि चिद्रेवार यांनी म्हटले आहे एकूण 35 कोटी रुपयांची थकबाकी असून त्यापैकी फक्त चार कोटी रुपयांची वसुली झाली आहे . अमृत योजनेच्या कामात 25% हिस्सा नगरपालिकेला द्यायचा आहे. त्यामुळे जवळपास 50 कोटी रुपये नगरपालिकेला द्यावे लागणार आहे नागरिकांकडे चार पाच वर्षापासून थकबाकी असल्याचे त्यांनी म्हटले आहे अशा थकबाकीदारांना प्रत्येकी दोन-दोन नोटीसा दिल्या आहे. वारंवार कर्मचाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत . तरीदेखील ते थकबाकी भरत नाही. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात येणार आहे तसेच शहरातील प्रत्येक वॉर्ड निहाय थकबाकीदारांची नावे असलेले फलक मुख्य रस्त्यावर लावण्यात येईल तसेच वृत्तपत्रात त्यांची नावे प्रसिद्ध करण्यात येतील असेही संदीप चिद्रवार यांनी म्हटले आहे . विभागीय आयुक्तांनी वसुलीचे निर्देश दिलेले आहेत . त्याची अंमलबजावणी करण्याकरिता थकबाकी वसुली केली जात आहे नागरिकांनी आपल्याकडे असलेली थकबाकी त्वरित भरावी असे आवाहनही मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार यांनी नागरिकांना केले आहे .
