प्रतिनिधी , पंढरपूर : श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या परिवार देवतांच्या ५ मंदिरासह विठ्ठलाच्या सभा मंडपाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले आहे. या विकास कामासाठी १ कोटी २८ लाख रूपयांचा खर्च करण्यात येणार असल्याचे श्री.विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
विठ्ठलाच्या परिवार देवतांमधील रिद्धी-सिद्धी मंदिर, लक्ष्मण पाटील देवस्थान, आंबाबाई मंदिर, रोकडोबा मारुती मंदिर, सोमेश्वर महादेव मंदिराच्या नूतनीकरण व सभा मंडपाच्या सुशोभीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा झाला. त्याचबरोबर मंदिरामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापक यांच्या कार्यालयाचे देखील उद्घाटन करण्यात आले.
