जनतेज न्युज

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा ची कामगिरी…….

प्रतिनिधी , पुणे : पोलीस हवा उदय काळभोर व विनायक रामाने हे त्यांच्या स्टाफ सह वानवडी पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार उदय काळभोर व विनायक रामाने याना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार सर्व्हे नं १०८/१०९ रामनगर, छोटी मशिद, राम मंदिराजवळ राम टेकडी ,हडपसर येथे सदर ठिकाणी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ लपवून ठेवले असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सदर स्टाफ च्या मदतीने छापा मारून आरोपी नामे गुलफाम इरफान अन्सारी वय-३४, रा- सर्वे नं १०८/१०९, छोटी मज्जिद ,राम मंदिर जवळ रामटेकडी, हडपसर पुणे रामटेकडी, हडपसर,पुणे यास शिताफीने पकडले .
आरोपी याने आपल्या आर्थिक फायद्यासाठी आपले कब्जात १,०७,३०१/- रुपये किंमतीची आरएमडी व विमल कंपनीचा पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ गुटखा माल हा अनाधिकाराने बेकायदेशीर रित्या विक्री करीता जवळ बाळगला असताना मिळून आला आहे. म्हणून त्याच्यावर वानवडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ८०/२०२१ , कलम ३२८,२७२,२७३,१८८ अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम ३(१)(झेड) (आय) स वचन अन्न सुरक्षा व मानके व नियमावली नियम २,१,३(४)(आय) प्रमाणे कारवाई करून आरोपी वानवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे.
सदरची कामगिरी
सहा फोज बुवा कांबळे, पोलीस हवा ५६१३ राजेश लोखंडे पोलीस हवा ११२५ उदय काळभोर ,पोलिस हवा ५४१२ दिनकर लोखंडे ,पो हवा२६३४ राजेश अभंगे, पोलीस हवा १६६९ शाकीर खान, पोलीस हवा १९८८ विनायक रामाने, पोलीस नाईक ५५ मनोज खरपुडे, पोलीस शिपाई ८६६६ अमोल सरतापे, चापोशी १०५१८ गंगावणे यांनी केली आहे.