प्रतिनिधी , वर्धा शहरात गोल मार्केट परिसरात लागलेल्या भीषण आगीत आज तब्बल 10 ते 15 दुकाने संपूर्ण जळून खाक झाले. यात भाजी व्यवसायिक आणि फ्रूट व्यवसायिक यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. सांगितले गेले तब्बल वीस ते पंचवीस लाख रुपयाचे नुकसान या संपूर्ण भागामध्ये या आगीमुळे झाले.
या परिसराची संपूर्ण पाहणी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी आज रात्रीच्या ११.३० वाजता वाजताच्या सुमारास केली असता ते म्हणाले पहिले प्राधान्य मी नुकसान झालेल्या व्यवसायिकांना कशा स्वरूपात मदत करता येईल याकडे बघेल आणि नंतर री स्ट्रक्चर कडे वळणार.
विशेष करून पालक मंत्री म्हणाले मी आज मुंबईत होतो परंतु मला या घटनेबद्दल माहिती मिळताच मी थेट इथे पोचलो आणि हे सरकार महा विकास आघाडीचे सरकार आहे आणि त्या नात्याने मी नक्की आश्वासन देतो की ज्यांचे नुकसान झाले ते भरपाई नक्कीच मिळणार परंतु हे भरपाई कशा स्वरूपात मिळेल हे मी आत्ताच सांगू शकणार नाही.
संपूर्ण घटनेचे तपास करून ही आग कशामुळे लागली किंवा लावल्या गेली हे बघितलं जाणार असेदेखील पालकमंत्री म्हणाले.
