प्रतिनिधी , बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शेतात कामे करत असतांना शेतकरी धुळीला कंटाळून संतप्त झाला आहे. मेहकर तालुक्यातील कल्याणा शिवारातील अनिरुद्ध तांगडे या शेतकऱ्याने कंटाळुन हातात कुऱ्हाड घेवून आज दुपारी आपल्या शेताजवळून जाणाऱ्या वाहनांना रोखुन काम बंद पाडले आहे. यावेळी शेतकऱ्याचे रुद्र अवतार रूप पाहून रस्ता तयार करणाऱ्या आपको कंपनीच्या अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडालेली होती.तसेच या ठिकाणी कामावरील टिप्पर व वाहनांची लांबच-लांब रांगा लागल्या होत्या..
व्हिओ- बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील 36 किलीमोटरचा समृद्धी महामार्गाचे काम आपको कंपनी मार्फत सुरू आहे. या महामार्गाच्या खालच्या बाजूला कच्चा अप्रोच रस्ता बनवण्यात आला आहे. दिवसभर महामार्गाच्या कामावरील ट्रक येणे-जाणे करत असतात.यामूळे रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात धुळी जात असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.सध्या तूर हरभरा गहु संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभा आहे हरभरा व तूर ही काढणीला आलेली आहे.धुळीमुळे शेतामध्ये मजूर कामाला येत नाही तूर हरभरा व गहू सोयाबीन या पिकांना एकरी दोनची झडती लागत आहे.शेतकरी हा केवळ रस्त्याच्या धुळीला त्रस्त झालेला आहे.कंपनी ने नियमाप्रमाणे दिवसातून तीन वेळा या रस्त्याला पाणी मारले पाहिजे जेणेकरून धूळ उडणार नाही.परंतु कंत्राटदार रस्त्यावर पाणीच मारत नसल्याने कंटाळून कल्याणा गावातील अनिरुद्ध तांगडे या शेतकऱ्याने चक्क हातामध्ये कुऱ्हाड घेऊन रस्त्यावर उभे राहून आज दुपारपासून कामावरील संपूर्ण वाहने बंद केल्या आहे.संबंधित अधिकारी इथे बोलवा त्याच्याशिवाय हे वाहने मी पुढे जाऊ देणार नाही.आणि मी कोणाच्या दारी जाऊन निवेदन देणार नाही.जर ही वाहने इथून जायचे असतील तर अधिकाऱ्यांनी माझ्या शेतामध्ये येऊन माझ्याशी बोलले पाहिजे अशी मागणी शेतकरी तांगडे यांनी लावून धरली आहे. यामुळे आपको कंपनीच्या अधिकाऱ्यांची यावेळी एकच तारांबळ उडाली होती..
