जनतेज न्युज

अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा विटंबणाचे गेवराई पडसाद ; तहसीलदार यांना निवेदन देऊन कारवाई ची मागणी

प्रतिनिधी , बीड : लातुर जिल्ह्यातील साकोळ गावात साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची काही समाजकंठकाकडुन विटंबना केल्याचा प्रकार घडला असुन या विटंबना करणाऱ्या समाजकंठकास तात्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे योगदान हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसुन ते सर्व समाजासाठी असुन संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल किंवा अंधश्रद्धा निर्मूलन ग्रामिण साहित्यिक उपेषितांचा आवाज , कामगारांचा आवाज सर्व दलीत दिनदुबळ्यांसाठी त्यांचे योगदान असुन त्यांच्या पुतळ्याची विटंबना महाराष्ट्रात होणे ही अतिशय निंदनीय व लाजीरवाणी गोष्ट अाहे त्यामुळे त्या समाजकंटकांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.